अंजु एस. शेंडे
श्रीमती. अंजू शं. शेंडे यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयात एम.एस्सी., एम.एस.डब्ल्यू. आणि एलएल.एम. या पदव्या प्राप्त केल्या आहेत. त्यांनी सुरुवातीस जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका प्रकल्पामध्ये सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणून काम केले.
त्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण घेऊन वकिली करण्यास सुरुवात केली आणि सन २०१० मध्ये जिल्हा न्यायाधीश म्हणून न्यायिक सेवेत प्रवेश केला.
आपल्या न्यायिक कारकिर्दीत त्यांनी विविध महत्त्वपूर्ण पदांवर कार्य केले आहे. त्यांनी अमरावती येथे विशेष न्यायाधीश (सीबीआय) तसेच काही काळ कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून कार्य केले आहे. त्यानंतर त्यांनी शहर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई येथे विशेष न्यायाधीश (सेबी) तसेच पोक्सो आणि महिलांवरील अत्याचार प्रकरणांशी संबंधित विशेष न्यायाधीश म्हणूनही कार्य केले आहे.
त्यांनी लघुवाद न्यायालय, वांद्रे, मुंबई येथे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश; औद्योगिक न्यायालय, नागपूर येथे सदस्य; तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ येथे निबंधक (प्रशासन) म्हणूनही कार्य केले आहे.
श्रीमती. अंजू शं. शेंडे यांनी बीड, भंडारा, उस्मानाबाद आणि अहमदनगर येथे प्रमुख जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्य केले असून, न्यायिक सेवेत त्यांनी व्यापक न्यायिक आणि प्रशासकीय अनुभव संपादन केला आहे.
त्यांनी दि. ०२.०१.२०२६ ते १३.०८.२०२६ या कालावधीत मा. मुख्य न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय यांच्या विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्य केले. त्यानंतर त्यांनी दि. १४.०८.२०२६ ते २०.०८.२०२६ या कालावधीत प्रमुख न्यायाधीश, शहर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई म्हणून कार्य केले.
सध्या, श्रीमती. अंजू शं. शेंडे या दि. २४.०८.२०२६ पासून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे म्हणून कार्यरत आहेत.