बंद

    न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते डेरे

    प्रकाशित तारीख: October 31, 2023

    मा. न्यायमुर्ती श्रीमती रेवती मोहिते डेरे यांचा जन्म पुणे येथे झाला असून त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण सेंट जोसेफ हायस्कूल, पाषाण, पुणे येथून घेतले. त्यांनी बारावी (कला शाखा) फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथून उत्तीर्ण केली व त्यांनी राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविले म्हणून त्यांना राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र पदान करण्यात आले. न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते डेरे यांनी सिम्बॉयोसिस विधी महाविद्यालय, पुणे येथून पाच वर्षाचा विधी अभ्यासक्रम पुर्ण केला व त्यांनी बी.एस.एल. प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण केले. तसेच एल.एल.बी.ची मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून गुणवत्ता यादीत दुस-या क्रमांक मिळवला व एल.एल.एम.चे शिक्षण केम्ब्रीज विद्यापीठ, यु.के. येथून पुर्ण केले व त्यांना एल.एल.एम.साठी केम्ब्रीज कॉमन वेल्थ ट्रस्टची शिष्यवृत्ती मिळवली.
    न्यायमुर्ती डेरे यांनी एल.एल.एम. ची परिक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांचे वडील तसेच प्रख्यात ज्येष्ठ विधिज्ञ श्री. विजयराव ए. मोहिते यांच्याकडे व तद् नंतर मुंबई येथील बॅरिस्टर राजा एस. भोसले यांच्याकडे वकीली व्यवसाय सुरु केला. न्यायमुर्ती श्रीमती रेवती मोहिते डेरे यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई फौजदारी, दिवाणी व संविधानात्मक प्रकरणे चालवले तसेच जिल्हा व सत्र न्यायालयात वकीली व्यवसाय केला.
    तसेच त्यांनी मुंबई उच्च न्यायालय येथे सहा. सरकारी वकील म्हणून रिट सेल व अपली प्रकरणांमध्ये काम केले. तसेच भारत सरकारच्या वतीने वरीष्ठ अधिवक्ता ( वर्ग १ व २) म्हणून काम केले. त्यांनी मा. उच्च न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील म्हणून केंद्र सरकारच्या वतीने काम केले. त्यांनी त्यांच्या पदोन्नतीपूर्वी महाराष्ट्र राज्याचे शासकीय अधिवक्ता व सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती झाली. तसेच मा. न्यायमुर्ती रेवती मोहिती डेरे यांनी जनहितार्थ याचिका व अन्य महत्वाचे प्रकरणे चालवली.
    दि-२१/०६/२०१३ रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.
    दि-०२/०३/२०१६ रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांना कायमस्वरुपी न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली.